
लेहमधील हिंसक आंदोलन आणि सोनम वांगचुक यांच्या अटकेनंतर लेह ऍपेक्स बॉडी (लॅब) संघटनेने केंद्र सरकारशी चर्चा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बंदुकीच्या धाकावर चर्चा होऊ शकत नाही, असे लॅबने स्पष्ट केले.
लडाखमध्ये सध्या भीती, शोक, संताप आणि तणावाचे वातावरण आहे. हे वातावरण निवळण्यासाठी केंद्र सरकार आणि लडाखमधील प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. जोपर्यंत शांतता प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत आम्ही केंद्र सरकारशी चर्चेत सहभागी होणार नाही, असे ‘लॅब’चे प्रमुख थुपस्थान चेवांग यांनी सांगितले.