मन की बात आता नागपुरातच सांगेन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना येत्या गुरुवारी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिक्षा वर्गाच्या समारोपाच्या समारंभाला जाण्याचे टाळावे, असे आवाहन अनेक काँग्रेस नेते करत आले आहेत, पण मुखर्जी यांनी मात्र ‘मन की बात’ आता ७ जूनला नागपुरात गेल्यावरच सांगेन,’ असे स्पष्ट केले. ते बंगालमधील ‘आनंद बझार पत्रिका’शी बोलत होते.

काँग्रेस नेते काय म्हणतात?

मुखर्जी यांनी त्यांच्या संपूर्ण राजकीय जीवनातून आम्हाला दिशा दिली, मार्गदर्शन केले. मग त्यांच्यासारखा नेता ‘संघा’च्या कार्यक्रमाला जाण्यास तयार व्हावा असे अचानक काय घडले?
– जयराम रमेश, ज्येष्ठ काँग्रेस नेते.

प्रणव मुखर्जी यांनी कार्यक्रमाला जरूर जावे, पण त्यांची विचारधारा कशी चुकीची आहे, हे त्यांनी ‘संघा’ला सांगण्यास विसरू नये.
– पी. चिदम्बरम, ज्येष्ठ काँग्रेस नेते.