
पुजारी आणि गुरुद्वारातील ग्रंथी सन्मान योजनेअंतर्गत दिल्लीतील सर्व पुजारी आणि ग्रंथींना दरमहा 18 हजार रुपये देण्याची घोषणा आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी केली. या योजनेवरून भाजपने केजरीवाल यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर माझ्याविषयी अपशब्द बोलून देशाचा विकास होणार आहे का? असा सवाल करत केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला आहे.

























































