विम्बल्डन पुढल्या वर्षी होणारच, आयोजक ऑल इंग्लंड क्लबकडून संकेत

कोरोनामुळे या वर्षी विम्बल्डन ही टेनिस विश्वातील जुनी व प्रतिष्ठsची स्पर्धा होऊ शकली नाही. दुसऱया महायुद्धानंतर पहिल्यांदाच असे घडले. पण आता यापुढे विम्बल्डन टेनिस स्पर्धा रद्द करण्यात येणार नाही. 2021 साली 28 जून ते 11 जुलै या कालावधीत ही स्पर्धा होणारच अशी माहिती आयोजक ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लबचे सीईओ सॅली बोल्टन यांच्याकडून यावेळी देण्यात आली.

सॅली बोल्टन पुढे म्हणाले, विम्बल्डन स्पर्धेचे आयोजन करायचे याकरिता आमचे प्रथम प्राधान्य असणार आहे. स्टेडियममध्ये सर्वांना परवानगी द्यायची की मर्यादित प्रेक्षकांना एण्ट्री द्यायची की प्रेक्षकांविना ही स्पर्धा खेळवायची याबाबत योजना आखली जात आहे. आमचा स्टाफ, प्रमुख पाहुणे व खेळाडू यांच्या सुरक्षेची व आरोग्याची काळजी यावेळी प्रामुख्याने घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट सांगितले.

कोरोनाच्या काळात मदतीसाठी पुढाकार
कोरोनामुळे विम्बल्डन स्पर्धा यावेळी खेळवण्यात आली नाही. पण ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लब व विम्बल्डन यांच्या वतीने मदत करण्यात आली. 200 व्यक्तींना ख्रिसमसपर्यंत जेवण देण्यात येणार आहे. तसेच 9 लाख 70 हजार डॉलर्स चॅरिटीमार्फत देण्यात आले आहेत. विम्बल्डनमधील 30 हजार टॉवेलही यावेळी दान करण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या