खलीच्या मदतीने मुंबई पोलिसांनी समजावले हेल्मेटचे महत्त्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई पोलीस अनेकदा क्रिएटिव्ह पोस्ट लिहून विविध विषयांवर संदेश देत असतात. त्याच्या हटके पोस्ट नेटकऱ्यांना खूप आवडतात. नुकतेच त्यांनी द ग्रेट खलीचा एक व्हिडियो शेअर केलाय आणि त्या माध्यमातून हेल्मेटच्या वापराबद्दल जनजागृती केलीय.

डब्ल्यूडब्ल्यूई रेसलर खलीच्या हातात हेल्मेट आहे. खली हेल्मेट डोक्यात घालायचा प्रयत्न करतो. मात्र भीमकाय खलीच्या डोक्यावर हेल्मेट नीट बसत नाही. कारण त्याच्या डोक्यापेक्षा हेल्मेट लहान आहे… असा व्हिडियो मुंबई पोलिसांनी शेअर केलाय. त्याला कॅप्शन लिहिलीय की, द ग्रेट खलीला माहीत आहे की व्यवस्थित हेल्मेट नसेल तर राईड फक्त घरीच करू शकतो. गाडी चालवताना हेल्मेट न लावून आपली मान लाजेने ‘खाली’ होऊ देऊ नका!
मुंबई पोलिसांनी शेअर केलेल्या खलीच्या व्हिडियोचे आणि जागृतीपर संदेशाचे नेटीजन्स जोरदार कौतुक करत आहेत. रस्ते सुरक्षा नियम आणि हेल्मेटचे महत्त्व सांगणाऱ्या या पोस्टला हजारो लाईक्स मिळाले आहेत.