लांडग्यांच्या हल्ल्यात 17 शेळ्यांचा मृत्यू, सहा गंभीर जखमी

92

सामना प्रतिनिधी । चाकूर

गेल्या अनेक दिवसापासून तालुक्यात बिबट्यांनी धुमाकुळ घालत माणसांसह जनावरांवर हल्ला केल्याची घटना घडली. मात्र आता सांडोळ येथे शिवारातील आखाड्यात बांधलेल्या शेळ्यावर लांडग्यांनी हल्ला केल्याची घटना मंगळवार व बुधवार रोजीच्या मध्यरात्री घडली. यात सतरा शेळ्याचा मृत्यू झाला तर सहा शेळ्या गंभीर झाल्या आहेत. त्यामुळे शेळ्या मालकांचे साधारणतः दोन लाखाचे मोठे नुकसान झाले आहे.

सांडोळ येथे दिवसभर शेळ्या चारून सुधाकर गोविंद जायभाये यांच्या गट क्र.107 मधील शेतातील आखाड्यात बांधल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास लांडग्यांनी हल्ला करून सतरा शेळ्याचा फडशा पाडला. घटनास्थळी वनपाल संजय कोंपलवार, प्रल्हाद घुले,मंडळ अधिकारी आर.एस.हाश्मी,पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत फड आदींनी भेट देवून पंचनामा केला आहे. मृत शेळ्याचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. तर जखमी शेळ्यावर उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या