चार वर्ष ‘लिव्ह इन’मध्ये राहिला, लैंगिक शोषण करून वेगळा झाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

सामना प्रतिनिधी । नागपूर

चार वर्ष ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहून तरुणीचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार नागपूरमध्ये उघडकीस आला आहे. पीडितेच्या आतेभावानेच हा प्रकार केला असून तो इंडियन बॅँकेत व्यवस्थापक पदावर कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे. प्रितेश परतेकी (२४) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ मे, २०१५ रोजी पीडित तरुणी आणि आरोपी प्रितेशचे नागपूर येथे एका नातेसंबंधातील व्यक्तीच्या विवाहाच्या कार्यक्रमात ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात झाले. त्या दरम्यान आरोपी गिट्टीखदान हद्यीतील प्लॉट नं. १२, एकता नगर, बोरगाव, गोरेवाडा रोड, नागपूर येथे राहात होता. या प्रेमातून दोघांमध्ये शारीरिक जवळीक झाली. आरोपी प्रितेश हा बँकेत व्यवस्थापक असून त्याने तरुणाला लग्नाचे आमिष दाखवले. प्रितेश हा नातेसंबंधातील आणि चांगल्या पगाराचा असल्यामुळे तिच्या सोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापीत केले. त्यानंतर दोघांनी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. १२ एप्रिल, २०१८ पर्यंत दोघेही एकत्र राहिले.

या दरम्यान आरोपी प्रितेशची चेन्नई येथे बदली झाली. आतेभाऊ लग्नच करणार असल्याने घरच्या विरोधाला न जुमानता तरूणीही त्याच्यासोबत चेन्नईला गेली. काही दिवस सुखासुखीचे गेल्यानंतर आरोपी तरूणीला ड्युटीवर जाण्यापूर्वी रूममध्ये बंद करून मारहाण करू लागला. आरोपीच्या या जाचामुळे त्रस्त झालेल्या तरूणीने नागपूर येथे परतल्यानंतर झालेला प्रकार कुटुंबीयांसमोर सांगितला. या प्रकरणी दोन्हीकडील वरिष्ठांनी समेट घडविण्याचा प्रयत्न केला, पण आरोपी प्रितेश परतेकी काही एक ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्यामुळे फिर्यादी तरूणीने दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी आरोपीविरूध्द कलम ३७६, ३४२, ३२३ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.