
ऑडिशनच्या नावाखाली महिलेची साडेतीन लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अंधेरी येथे राहणाऱया महिलेला गेल्या आठवडय़ात व्हाट्सअॅपवर ऑडिशनबाबत मेसेज आला होता. महिलेने मुलीचे फोटो, व्हिडिओ ऑडिशनसाठी त्या नंबरवर पाठवले. त्यानंतर ठगाने तुमच्या मुलीची निवड झाली आहे अशा भूलथापा मारल्या. महिलेला तिच्या मुलीचा पोर्ट फोलिओ आणि शूटिंगसाठी पॅकेज निवडण्यास सांगितले. महिलेला सुरुवातीला 29 हजार रुपये पाठवण्यास सांगितले. विश्वास बसावा म्हणून ठगाने महिलेला करार झाल्याचा पेपर पाठवला. त्यानंतर ठगाने विविध कारणे सांगून महिलेकडून आणखी पैसे उकळले. हा प्रकार महिलेला संशयास्पद वाटल्याने तिने अंधेरी पोलीसांत तक्रार केली.



























































