बाळाला नाव सुचवून महिला करतेय कोटय़वधींची कमाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाळ जन्माला आल्यावर त्याचे नाव काय ठेवायचे यावर घराघरात मोठी चर्चा सुरू असते. आपल्या बाळाचे नाव वेगळे आणि अर्थपूर्ण असावे अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. नाव शोधण्यासाठी काही जण इंटरनेटची मदत घेतात तर काही जण पुस्तकांची. पण तुम्हाला माहितेय, आपल्या बाळाचे नाव काय ठेवायचे याबाबत संभ्रमात असलेले न्यूयॉर्कमधील पालक चक्क ‘बेबी नेमर’ची मदत घेतात. 33 वर्षीय ए. हम्फ्रे ही महिला गेल्या अनेक वर्षांपासून अशा पालकांना त्यांच्या बाळासाठी योग्य नाव सुचवण्यासाठी मदत करतेय. त्यासाठी ती तब्बल साडेसात लाख रुपये फी आकारते. गेल्या वर्षभरात तिने शंभरहून अधिक मुलांची नावे ठेवली आहेत. या हटके जॉबमधून ती कोटय़वधी रुपयांची कमाई करत आहे. ‘पालक आपल्या बाळासाठी चांगल्या नावाच्या शोधात असतात. अर्थपूर्ण नावांना आमच्याकडे विशेष महत्त्व आहे. त्यांना असे अर्थपूर्ण नाव शोधून द्यायला मला खूप आवडते. म्हणून हे काम मी आवडीने करते,’ असे हम्फ्रे हिने एका मुलाखतीत सांगितले.