तोंडात बोळा कोंबून अनैसर्गिक सेक्स करायचा, सिरीयल किलर नवऱ्याचा बायकोकडून भांडाफोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका महिलेने आपल्या नवऱ्यावर गंभीर आरोप केल्याची घटना मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये घडली आहे. महिलेने थेट पोलिसांत धाव घेतली असून तिने आपल्या सिरीयल किलर नवऱ्याचा भांडाफोड केला आहे.

ग्वाल्हेर येथे पोलिसांच्या जनसुनवाई या अभियानातंर्गत सामान्य जनता आपल्या तक्रारी त्यांच्यासमोर मांडू शकते. याच अभियानात ही महिला आपली तक्रार घेऊन आली होती. या महिलेचा नवरा सिरीयल किलर आहे. त्याने आतापर्यंत चार हत्या केल्या आहेत. आता त्याला आपल्या बायकोचीही हत्या करायची आहे, असा आरोप तिने केला. महिलेच्या नवऱ्याचं नाव राजेंद्र असल्याचं उघड झालं.

पोलिसांनी राजेंद्रला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली तेव्हा त्याने चार जणांना ठार मारल्याचं कबूल केलं. त्याच्यावर 36 लाखांच्या अपहाराचाही आरोप आहे. ते कळताच त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या अटकेनंतर काही दिवसांनी ती महिला पुन्हा पोलिसांसमोर आली आणि तिने यावेळी अजून एक गंभीर आरोप केला.

महिलेच्या आरोपांनुसार, राजेंद्र तिच्यासोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवत होता. तिचे हातपाय बांधून आणि तिला बेदम मारहाण करून तो हे प्रकार करत होता. ती ओरडू नये म्हमून तिच्या तोंडात बोळा कोंबून तो तिच्यासोबत जबरदस्तीने असे संबंध ठेवत होता, असा गंभीर आरोप महिलेने केला आहे. पोलिसांनी या संबंधी अधिक चौकशी सुरू केली असून राजेंद्रवरील सर्व आरोपांचा कसून तपास करण्यात येत आहे.