
दादर येथे पदपथावर राहणाऱ्या एका 40 वर्षीय महिलेने शनिवारी भरदिवसा तिच्यावर दादरच्या उड्डाणपुलाखाली तीन जणांनी बलात्कार केल्याचा दावा केला आहे. हे तिघेही महिलेच्या ओळखीचे आहेत. या तिघांनी मला अंमली पदार्थ देऊन माझ्यावर बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
महिलेने पोलीस तक्रारीत म्हटले आहे की, ती दुपारी उड्डाणपुलाखाली तिघांसोबत मद्यपान करत होती. यावेळी नशेत असताना तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. यानंतर महिलेला पोटात दुखू लागल्याने ती तिच्या पतीसोबत केईएम रुग्णालयात गेली. यावेळी तीन ओळखीच्या लोकांनी माझ्यावर बलात्कार केल्याचे तिने डॉक्टरांना सांगितले.
मात्र हे प्रकरण कायदेशीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना पोलिसांकडे जाण्यास सांगितले. यावेळी भोईवाडा पोलीस ठाण्यात महिलेचा जबाब नोंदवून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी संजय रामराव उर्फ हटेला याला अटक केली आहे. तर इतर दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.

























































