पेनकिलर्स खाल्ली आणि बोळकी झाली, 19 वर्षाच्या तरूणीने व्यक्त केलं दु:ख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेनकिलर्स घेण्याची सवय असणाऱ्यांसाठी ही बातमी आहे. एका तरूणीने पेनकिलर्सबाबत केलेल्या दाव्याने सगळ्यांनाच हादरा बसला आहे. वयाच्या 19 व्या वर्षी पेनकिलर्समुळे तरूणीचे सर्व दात पडून बोळकं झालं.

नताली लकासे असे त्या तरूणीचे नाव असून कॅनडा येथील वेंकूवर येथील रहिवासी आहे. नताली वयाच्या 12 वर्षी जबड्याच्या वेदनांनी हैराण झाली होती. तिला टेम्पोरोमॅंडिबुलर डिसऑर्डर आहे. त्यामुळे तिच्या जबड्याला वेदना व्हायच्या. या वेदनेपासून सुटका मिळविण्यासाठी नतालीने वयाच्या 18 व्या वर्षापासून पेनकिलर घ्यायला सुरूवात केली. मात्र त्याने तिच्या पोटात फोड येऊ लागले. तिला पाच महिने उलट्या होत होत्या. वयाच्या 19 व्या वर्षी तिचे सगळे दात पडून तिचं बोळकं झालं. ती लोकांपासून तिचा चेहरा लपवायला लागली, लोकांपासून दूर राहू लागली. आता तिच्याबाबत लोकं वेगवेगळ्या चर्चा करत आहेत. त्यामुळे तिला नैराश्य आले आहे.

नतालीने सांगितले की, ”अनेक वर्ष मला अस्वस्थ वाटत होतं. मी स्वत:ला आरशात पाहायलाही घाबरायचे. मानसिक स्वास्थ्य बिघडले होते. जेव्हा डॉक्टर दात बघायचे आणि त्यांच्या स्थितीबाबत बोलायचे तेव्हा ते कायम तिला ड्रग्सबाबत  विचारायचे. तेव्हा मी त्यांना सांगायचे, असे मी काही करत नाही. मात्र कोणी तिच्यावर विश्वास ठेवत नव्हते”. तसेच पुढे ती सांगते की, 18 वर्षाची असताना नतालीचा कार अपघात झाला होता. त्यावेळी तिच्या माकडहाडाला दुखापत झाल्याने तिला रूग्णालयात दाखल केले होते. त्यासाठी डॉक्टरांनी तिला पेनकिलर दिल्या होत्या. या गोळ्या एक ते दोन आठवडे घ्यायला सांगितल्या होत्या तिथून तिला हा त्रास सुरू झाला. नतालीला बऱ्याच उलट्या व्हायच्या. प्रत्येक उलटीनंतर ती ब्रश करायची. त्यानंतर तिचे दात तुटायला लागले. आपल्या हास्यासाठी तिने 4 लाख खर्च केले आहेत.