पुरुषासोबत मैत्री केली म्हणून तोंडाला काळे फासत महिलेचे केले मुंडन, व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुरुषासोबत मैत्री केली म्हणून एका महिलेचे मुंडन करून तिच्या तोंडाला काळे फासत गावातून धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशमधील कन्नोज जिल्ह्यात समोर आला आहे. या महिलेच्या नवऱ्याचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तिच्या सासरच्या दोघांना अटक केली.

37 वर्षीय ही महिला कुसुरी गावात तिच्या पतीसोहत राहायची. मात्र दोन महिन्यांपूर्वी या महिलेच्या पतीने आत्महत्या केली. त्यानंतर या महिलेच्या ओळखीचा एक अपंग व्यक्ती तिला घऱातील काही सामान वगैरे आणून देण्यासाठी मदत करायचा. मात्र त्या व्यक्तीसोबत महिलेचे बोलणे तिच्या गावातील काही नातवाईकांना आवडायचे नाही. मंगळवारी सदर महिला त्या पुरुषासोबत बोलत असताना तिचे दोन नातेवाईक तिथे आले. त्यांनी त्या दोघांनाही मारहाण करून त्यांचे मुंडन केले. त्यानंतर त्यांच्या तोंडाला काळे फासले व गळ्यात चपलांचा हार घालून त्यांची गावातून धिंड काढली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तेव्हा महिलेने तिच्या नातेवाईकांविरोधात तक्रार दिली. त्यानंतर दोघांना अटक केली तर सहा जण फरार आहेत.