
तुझे वडील माझ्या घरासमोर चकरा मारतात अशी तक्रार महिलेने मुलाकडे केल्याच्या रागातून बापाने मुलादेखत महिलेचा विनयभंग केला. मुलाकडे मदतीसाठी विनवणी केली असता त्याने ही शिवीगाळ केल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथे घडली बापलेकाविरुद्ध कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी ही मंगळवारी 31 डिसेंबर रोजी रात्री 9:30 वाजता आपल्या घरातील पलंगावर बसून टीव्ही पाहत असताना आरोपी विठ्ठल गणपत निकम व गणेश विठ्ठल निकम हे दोघे घरात घुसले. विठ्ठल निकम यांनी तू माझ्या मुलाला काय सांगितले असा सवाल त्यांना केला. त्यानंतर आता त्याच्या समोरच तुला मिठी मारतो असे सांगत त्या पीडित महिलेला मिठी मारली. तसेच त्या महिलेला लाज वाटेल असे कृत्य देखील केले. त्यावेळी त्या महिलेने गणेश याच्याकडे मदत करण्याची विनंती केली तेव्हा त्याने त्या महिलेला शिवीगाळ केली. त्या दरम्यान महिलेने विठ्ठल निकम यांच्या हाताला धक्का मारुन त्यांनी घराबाहेर पडत आरडाओरडा केला. तेव्हा रोडलगत बसलेले संतोष छबू निकम, नारायण भागवत निकम, पुंडलिक भाऊसाहेब निकम, हौशीराम छबू निकम या चौघांनी त्या महिलेची मदत केली व गणेश आणि त्याच्या वडिलांना घराबाहेर काढले.
या प्रकरणी पिडीत महिलेने कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून आरोपी विठ्ठल गणपत निकम व गणेश विठ्ठल निकम या दोघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल कटकेंच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस. सी. पवार हे तपास करीत आहे.























































