
प्रेमामध्ये धोका झालेल्या व्यक्ती निराश होतात. नैराशेच्या भरात ते कोणेतही टोकाचे पाऊल उचलतात.मात्र, चीनमध्ये लव्ह, सेक्स, धोकाची अनोखी घटना समोर आली आहे. प्रेमात धोका देणाऱ्या प्रेयसीचा प्रियकराने वेगळ्या पद्धतीने बदला घेतला. प्रसारमाध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर याची चर्चा आहे.
चीनमधील ही घटना असून प्रियकर आणि प्रेयसीचे 2 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सहा महिन्यांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता. तसेच त्यांचे लग्नही ठरले होते. लग्नासाठी हॉल मित्रमंडळी आणि नातेवाईकांनी भरुन गेला होता. आता सगळ्यांना त्या दोघांच्या आगमनाची प्रतीक्षा होती. ते दोघे आले आणि हॉलमध्ये उत्साहाचे वातावरण दिसू लागले. त्यावेळी पाहुण्यांसाठी त्यांच्यातील जिव्हाळा दर्शवणारे व्हिडीओ दाखवण्यात येत होते. हे दोघे एकमेकांच्या जवळ कसे आले ते आपण या व्हिडीओमधून बघू असे सांगण्यात आले. त्यानंतर जो व्हिडीओ दाखवण्यात आला,त्याने सगळ्यांना धक्का बसला. तो एक सेक्स व्हिडीओ होता. त्यात नववधू होणारी मुलगी तिच्या बहिणीच्या नवऱ्यासोबत संभोग करत असल्याचे दाखवण्यात आले होते. हा व्हिडीओ बघून नववधूला धक्काच बसला. तर त्याच वेळी तिच्याशी लग्न करणारा प्रियकर अचानक आक्रमक झाला आणि म्हणाला, तुला काय वाटले, तुझ्या या संबंधांबाबत मला माहिती नाही. मला याची आधीच माहिती होती. तू मला धोका दिला आहे. त्याची ही परतफेड आहे, असे म्हणून बुके तिच्या अंगावर फेकून तो निघून गेला. ‘अॅपल डेली’ ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
आपल्या प्रेयसीचे तिच्या बहिणीच्या नवऱ्याशी संबंध असल्याची माहिती प्रियकराला मिळाली होती. ही माहिती मिळाल्यावर त्याला धक्का बसला. प्रेयसीने आपल्याला फसवले, ही गोष्ट त्याला बोचत होती. या घटनेचा बदला घेण्याचे त्याने ठरवले आणि लग्नाच्या दिवशी सर्व पाहुण्यांसमोर त्याने हा व्हिडीओ दाखवला. लग्नानंतर राहायला जाण्यासाठी त्या दोघांनी नवीन घर घेतले होते. या घरात प्रियकराने छुपा कॅमेरा लावला होता. घराची चाबी त्या दोघांकडेही होती. प्रेयसी तिच्या बहिणीच्या नवऱ्यासोबत या घरात नेहमी येत होती. तिथेच त्यांचे संबंध प्रस्थापित झाले होते. काही कामानिमत्त प्रियकराने घरातील छुप्या कॅमेऱ्यातील फूटेज पाहिले, तेव्हा त्याला त्यांच्या संबंधांबाबतची माहिती मिळाली. त्यामुळे त्याला धक्का बसला. आपल्या प्रेयसीचे खरे रुप जगासमोर आणण्यासाठी त्याने व्हिडीयोची योजना आखली आणि लग्नाच्या दिवशीच तो व्हिडीओ सगळ्यांना दाखवला. तसेच इंटरनेट आणि सोशल मीडियावरही हा व्हिडीओ व्हायरल केला.
या घटनेनंतर आपण हे लग्न मोडत असल्याचे त्याने जाहीर केले. या घटनेतून प्रेयसीची बदनामी करण्याचा आपला हेतू नसून तिचे खरे रुप जगाला समजावे आणि तिने परत कोणालाही धोका देऊ नये, यासाठीच आपण हे केल्याचे त्याने सांगितले. आपली बदनामी करण्याचा हेतू नसेल तर सोशल मीडियावरून आपले व्हिडीओ हटवण्याची मागणी प्रेयसीने केली आहे.




























































