Women’s World Cup – टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर 155 धावांनी दणदणीत विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर महिला टीम इंडियाचा मुकाबला शनिवारी बलाढ्य वेस्ट इंडिजशी झाला. या सामन्यात वेस्ट इंडिजला धूळ चारत टीम इंडियाने 155 धावांनी विजय मिळवला आहे.

विश्वचषकात वेस्ट इंडीज हिंदुस्थानला एकदाही पराभूत करू शकलेला नाही. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत झालेले सहा सामने हिंदुस्थानने जिंकले आहेत. त्यामुळे शनिवारच्या सामन्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. हिंदुस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली.

सलामीला उतरलेल्या स्मृति मंधाना आणि यास्तिका भाटिया यांनी 49 धावांची भागीदारी रचली. याच वेळी स्मृति मंधाना हिने 100च्या स्ट्राईक रेटने 119 चेंडूत 123 धावा केल्या. तिच्या जोडीला आलेल्या हरमनप्रीतनेही शतकी कामगिरी करत 109 धावा केल्या. या संघातील वरिष्ठ खेळाडूंच्या उंचावलेल्या खेळामुळे टीम इंडियाची धावसंख्या 8 बाद 317 इतकी झाली.

या धावसंख्येचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाने 40.3 षटकांत सर्वबाद 162 धावांची खेळी केली. हिंदुस्थानकडून स्नेह राणा हिने 3 तर मेघना सिंह हिने 2 बळी घेतले. त्यामुळे टीम इंडियाला 155 धावांनी दणदणीत विजय मिळाला.