
हाजी अली येथे कोस्टल रोड प्रकल्पांतर्गत नियोजित असलेल्या भूमिगत चारस्तरीय पार्किंग तळाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. जमिनीखाली 15,400 चौरस मीटर कार्पेट क्षेत्रावर उभारण्यात येत असलेल्या या पार्ंकग तळाच्या क्षेत्रात तब्बल 1069 कार पार्ंकग करता येणार आहेत. पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत पार्ंकग तळाचे काम पूर्ण करून वाहनधारकांसाठी सेवा खुली करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.
कोस्टल रोडमुळे दक्षिण मुंबईतील रस्ते वाहतुकीला गती मिळाली आहे. महाविकास आघाडी सरकारने हाती घेतलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत हाजी अली येथे भूमिगत पार्ंकग सुविधा उपलब्ध केली जात आहे. सुरुवातीला दोन पार्किंग तळाचे बांधकाम प्रस्तावित होते. नंतर त्यात बदल करून चार पार्ंकग तळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रशस्त चारस्तरीय पार्ंकग तळामध्ये एपूण 1,069 कार तसेच 70 बसगाडय़ा पार्किंग करण्याची व्यवस्था असेल. हाजी अली येथे गाडय़ा पार्किंगची सुविधा पुढील वर्षाखेरीपर्यंत उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत. त्यानंतर वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.


























































