नगर जिल्ह्यात बंदला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा कामगार संघटनांचा दावा

430

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या कामगार आणि नागरिकविरोधी धोरणाच्या निषेधार्थ देशभरातील 25 कोटी कामगार आह 8 जानेवारी रोजी लाक्षणिक संप पुकारला होता. नगर जिल्ह्यातही संप पुकारण्यात आला होता. या संपाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा कामगार संघटनांनी केला आहे. नगर जिल्ह्यातील बँक, पोस्ट ऑफिसे, शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. नगर शहरामध्ये कामगारांनी मोर्चा काढला होता. औद्योगिक वसाहतीमध्ये सुद्धा कामगारांनी निदर्शने केली. केंद्र सरकारच्या धोरणाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. या संपाच्या पार्श्वभूमीवर ठिकाणी पोलिस बंदोबस्त सर्वत्र तैनात करण्यात आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या