जगातला सर्वात महागडा घटस्फोट, पत्नीला दिले तब्बल 2.52 लाख कोटींचे शेअर्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

अॅमेझॉन या जगातल्या प्रसिद्ध असलेल्या ई-कॉमर्स कंपनीचे संस्थापक जेफ बेजोस यांनी पत्नीसोबत घटस्फोट घेतला आहे. बेजोस आणि त्यांची पत्नी मॅकेंजी सोबत घेतलेला घटस्फोट हा जगातला सर्वात महागडा घटस्फोट मानला जातो. या घटस्फोटामुळे मॅकेंजी जगातील चौथी सर्वात श्रीमंत महिला ठरली आहे. तिला या घटस्फोटामुळे 2.52 लाख कोटीं रुपयांचे शेअर्स मिळाले आहेत.

जेफ बेजोस यांनी 1994 साली अॅमेझॉनची स्थापना केली. मॅकेंजी ही अॅमेझॉन कंपनीतील पहिली कर्मचारी होती. आज अॅमेझॉन जगातला एक प्रसिद्ध ब्रँड बनला आहे. बेजोस यांच्याकडे सध्या अॅमेझॉन गृपच्या 15 पेक्षा अधिक कंपन्यांची मालकी आहे. याशिवाय ते एक वृत्तपत्र, एक रॉकेट कंपनी तसेच अनेक वेबसाईट कंपन्यांचे मालक आहेत.