World Cup 2023: हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान सामन्याची तारीख बदलली, पाहा काय आहेत बदल

आगामी वर्ल्ड कप 2023 मधील ग्रुप स्तरावरील हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान सामना अधिकृतपणे नव्या तारखेला नियोजित करण्यात आला आहे. नवीन तारीख 14 ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे. आयसीसीने जाहीर केले आहे की या स्पर्धेतील 8 इतर सामने देखील पुनर्नियोजित करण्यात आले आहे.

पाकिस्तानचे तब्बल 3 सामने पुनर्नियोजित करण्यात आले आहेत तर नेदरलँड्सविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यासह हिंदुस्थानचे 2 सामने पुनर्नियोजित करण्यात आले आहेत.

असे आहे वर्ल्ड कपचे पूर्ण वेळापत्रक:

इंग्लंड विरुद्ध बांगलादेश – 10 ऑक्टोबर, 10:30 सकाळी

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका – 10 ऑक्टोबर, दुपारी 2 वाजता

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका – गुरुवार, 12 ऑक्टोबर ते दुपारी २ वाजता

न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश – शुक्रवार, 13 ऑक्टोबर – दुपारी 2 वाजता

हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान – शनिवार, 14 ऑक्टोबर – दुपारी 2 वा

इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान – रविवार, 15 ऑक्टोबर ते दुपारी 2 वा

ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश – शनिवार, 11 नोव्हेंबर – सकाळी 10:30

इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान – शनिवार, 11 नोव्हेंबर – दुपारी 2 वा

हिंदुस्थान विरुद्ध नेदरलँड्स – रविवार, 12 नोव्हेंबर ते दुपारी २ वाजता