इराण – इस्रायल युद्धामुळे जगभरात चिंता

सीरियातील इराणी दूतावासावर झालेल्या हल्ल्याचा बदला म्हणून रविवारी भल्या पहाटे इराणने इस्रायलवर हवाई हल्ला चढवला. तब्बल 150 क्षेपणास्त्रांचा मारा करतानाच स्पह्टकांसह 170 ड्रोन इराणने इस्रायलवर सोडले. या हल्ल्यामुळे अवघे जग चिंताग्रस्त झाले आहे. या हल्ल्याचा बदला घेणार असून इराणला चोख प्रत्युत्तर देण्यात येईल यावर इस्रायलच्या युद्ध मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमत झाले. त्यामुळे पश्चिम आशियात युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणमध्ये पैदेत असलेल्या 17 हिंदुस्थानींच्या सुकटेसाठी परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केल्याचे वृत्त आहे.

इराणने शनिवारी इस्रायलच्या अब्जाधीशाचे जहाज ताब्यात घेतले. हे मालवाहू जहाज हिंदुस्थानात येत होते. त्यात 17 हिंदुस्थानी क्रू मेंबर्स होते. दोन्ही देशातील वादाचा फटका इतर देशांनाही बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी आपापसातील वाद शांततेत आणि मुत्सद्देगिरीने सोडवले पाहिजेत, असे मत हिंदुस्थानने मांडले आहे.

इस्रायलला प्रतिहल्ला न करण्याचे आवाहन

इराणने केलेल्या हल्ल्याला इस्त्रायलने प्रत्त्युत्तर देऊ नये, असे आवाहन ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीसह काही देशांनी केले आहे. परिस्थिती चिघळेल असे काहीही करू नका, असे आवाहन इस्त्रायलला करण्यात आले आहे. दरम्यान, या वेळी जगाला आणखी एक युद्ध परवडणारे नसल्याचे संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो गुटेरस यांनी म्हटले आहे. इराणविरुद्धच्या सुडाच्या भावनेने संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे.

तिसरे महायुद्ध टाळण्यासाठी इराणला रोखले पाहिजे – इस्रायल

इराणच्या हल्ल्यानंतर रविवारी रात्री उशिरा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची महत्त्वाची बैठक झाली. जागतिक शांततेसाठी आणि तिसरे महायुद्ध टाळण्यासाठी इराणला रोखणे अत्यंत आवश्यक असल्याचे इस्रायलचे राजदूत गिलाड एर्डन यांनी म्हटले आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत इराणचे राजदूत आमीर इरवानी यांनी आम्ही जे काही केले ते आमच्या सुरक्षेसाठी केल्याचे सांगितले. यूएनच्या कलम 51 नुसार आम्हाला तसे करण्याचा अधिकार आहे. आम्ही इस्रायलमधील लष्करी तळाला लक्ष्य केले, आम्हाला युद्ध करायचे नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले.

हल्ल्याची कल्पना होती

इराणने इस्रायलवर हल्ल्याच्या 48 तास आधी सौदी आणि आखाती देशांना नोटीस दिली होती. जेणेकरून ते त्यांच्या हवाई क्षेत्राचे रक्षण करू शकतील. अमेरिकेलाही ही माहिती तुकाaमार्फत देण्यात आली होती. तर अमेरिकेने इराणला मर्यादित कारवाई करण्याचा सल्ला दिला होता, असे जेरुसलेम पोस्टने म्हटले आहे. मात्र हे वृत्त अमेरिकेने फेटाळून लावले आहे. दरम्यान, इस्रायलच्या युद्ध गुह्यांविरोधात आवाज न उठवल्याबद्दल आम्ही पाश्चात्य देशांकडून उत्तरे मागितली पाहिजेत. आम्ही जे केले ते स्वतःचे संरक्षण करण्यासाठी होते. इस्रायलवर मोठी कारवाई न केल्याने पाश्चात्य देशांनी इराणचे काwतुक करावे, असे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवत्ते नासेर कनानी यांनी म्हटले आहे.

‘ऑपरेशन टू प्रामीस’

इराणने केलेल्या हल्ल्यात इस्रायलच्या नेवाटीम हवाई तळाचे नुकसान झाल्याची माहिती आहे. इराणने या इस्रायलवरील हल्ल्याला ‘ऑपरेशन टू प्रॉमीस’ असे नाव दिले आहे. 1 एप्रिल रोजी इस्रायलने सीरियातील इराणी दूतावासाजवळ हवाई हल्ला केला. यात इराणच्या दोन सर्वोच्च लष्करी कमांडरसह 13 जण मारले गेले. यानंतर इराणने बदला म्हणून इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. रविवारी पहाटे क्षेपणास्त्रs डागून ही धमकी इराणने खरी केली.