
गुजरातमधील अहमदाबाद येथे जगातील सर्वात मोठे क्रीडा मैदान तयार करण्यात आले आहे. 63 एकरमध्ये बनवण्यात आलेल्या या मैदानाला 700 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. या मैदानात एकाचवेळी 1 लाख 10 हजार लोक क्रिकेटचा सामना पाहू शकणार आहेत. या मैदानाचे नाव ‘सरदार पटेल गुजरात स्टेडियम’ ठेवण्यात आले आहे. याआधीही या मैदावर सामने खेळवण्यात आले आहेत. परंतु आता पुर्ननिर्माणानंतर है मैदान अतिभव्य करण्यात आले आहे.
हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री व गुजरात क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) अध्यक्ष असताना मोटेरा येथे जगातील सर्वात मोठे मैदान तयार करण्याचे स्वप्न पाहिले होते. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचे हे स्वप्न विद्यमान गृहमंत्री आणि जीसीए अध्यक्ष अमित शहा यांनी पूर्णत्वास नेले. या मैदानाचे भूमिपुजन जानेवारी 2016 ला करण्यात आले होते. डिसेंबर 2019 पर्यंत हे मैदान पूर्ण होईल आणि 2020 ला यावर आंतरराष्ट्रीय सामनाही खेळवण्यात येईल.
काय आहे खास?
- 63 एकरमध्ये हे मैदान तयार करण्यात आले आहे.
- एकाचवेळी एक लाख 10 हजार लोक क्रीकेटचा सामना पाहू शकणार.
- मैदानात तीन प्रॅक्टिस ग्राऊंड, क्लब हाऊस, ऑलिम्पिकसारख्या आकाराचे स्विमिंग पूल आणि एक क्रिकेट अकॅडमी असणार आहे.
- कार आणि दुचाकींसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्या. एकाचवेळी 4 हजार कार आणि 10 हजार दुकाच्या पार्किग करता येणार.
- क्रिकेटच्या मैदानावर पहिल्यांदाच एलईडी लाईट लावण्यात येणार.

याआधीही झालेत सामने…
या भव्यमैदानावर याआधीही क्रिकेट सामने झाले आहेत. परंतु पुर्ननिर्माणानंतर हे मैदान अधिक भव्य करण्यात आले आहे. याच मैदानावर 1982 रोजी सुनील गावस्कर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 10 धावा ठोकण्याचा बहुमान पटकावला होता. तसेच कपिल देव यांनी न्यूझीलंडच्या रिचर्ड हेडली यांचा कसोटीत सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम याच मैदानावर तोडला होता. एवढेच नाही तर सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधील आपले पहिले दुहेरी शतक याच मैदानावर ठोकले होते.



























































