
सामना प्रतिनिधी, मुंबई
जगभरात शनिवार, 20 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक चंद्र महोत्सव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी अनेक देशांतील खगोल अभ्यासक चंद्राकडे दुर्बिणी रोखून चंद्राचे निरीक्षण करणार असल्याचे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. नासा प्लॅनेटरी सोसायटी ल्यूनर व प्लॅनेटरी इन्स्टिटय़ूटतर्फे जगातील सर्व खगोल अभ्यासकांना दुर्बिणीतून चंद्राचे निरीक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत उद्या दुपारी 3 वाजून 36 मिनिटांनी चंद्रोदय होईल. उत्तररात्री 3 वाजून 33 मिनिटांनी चंद्र अस्त होईल. त्यामुळे रात्री काळोख पडल्यापासून उत्तररात्री 3.33 पर्यंत चंद्र निरीक्षण करता येईल. सप्तमी-अष्टमीचा चंद्र हा दुर्बिणीतून निरीक्षण करण्यात खूप मजा असते. कारण त्या दिवशी अर्धे चंद्रबिंब प्रकाशित दिसल्याने चंद्राच्या पृष्ठभागावरची विवरे चांगली निरीक्षण करता येतात.
दरवर्षी सप्टेंबर-आक्टोबर महिन्यात सप्तमी-अष्टमीजवळच्या शनिवारी असा चंद्र निरीक्षणाचा महोत्सव आयोजित केला जातो.
20 जुलै 1969 रोजी नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पाऊल ठेकले.
पुढच्या वर्षी 20 जुलै 2019 रोजी या घटनेला 50 वर्षे पूर्ण होत आहेत.
15 ऑगस्ट 2019 रोजी ‘इस्रो’ संस्थेलाही 50 वर्षे होत आहेत.
22 ऑक्टोबर 2008 रोजी हिंदुस्थानचे चांद्रयान -1 चंद्राच्या दिशेने झेपावले.
पुढच्या वर्षी चांद्रयान-2
पुढच्या वर्षी चांद्रयान-2 हे चंद्राकडे पाठवण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे दुर्बिण आहे त्यांनी दुर्बिण चंद्राकडे रोखून चंद्रपृष्ठभागावरची विवरे निरीक्षण करावी आणि जागतिक चंद्र महोत्सवामध्ये सामील व्हावे, असे आवाहन सोमण यांनी केले.
summary- world moon day is on 20th october


























































