जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनल, पहिला दिवस पावसाचा!

जगभरातील तमाम क्रिकेटप्रेमींच्या नजरा हिंदुस्थान-न्यूझीलंड यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलवर खिळल्या होत्या. पण या दोन देशांमधील लढतीचा पहिला दिवस पावसाच्या व्यत्ययामुळे वाया गेला. शुक्रवारच्या खेळात नाणेफेकही झाली नाही. त्यामुळे एकही चेंडू टाकला गेला नाही. पंचांनी खेळपट्टी व मैदानाचे निरीक्षण करून पहिला दिवस रद्द करण्याचा निर्णय घेतला.

हिंदुस्थान-न्यूझीलंड फायनल लढतीसाठी आयसीसीकडून सहाव्या दिवसाचा पर्याय ठेवण्यात आला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ वाया गेल्यानंतर आता सहावा दिवस वापरात येईल हे पक्के झाले आहे. त्यामुळे दोन देशांमधील हा सामना 19 ते 23 जून या पाच दिवसांच्या कालावधीत होईल असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या