
हिंदुस्थान – न्यूझीलंड यांच्यामध्ये 18 जूनपासून खेळवण्यात येणाऱया जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी टीम इंडियाच्या 15 शिलेदारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. शार्दूल ठाकूरऐवजी उमेश यादवला या संघात पसंती देण्यात आली आहे. तसेच मयांक अग्रवाल, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर व लोकेश राहुल यांना बाहेर ठेवण्यात आले आहे.
टीम इंडियाचा संघ – विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहीत शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रिद्धीमान साहा (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज.
द्रविडच प्रशिक्षक
हिंदुस्थानचे दोन संघ एकाच कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहेत. विराट कोहलीचा संघ इंग्लंमध्ये कसोटी मालिका खेळेल. शिखर धवनचा संघ श्रीलंकेत झटपट मालिकेत यजमानांशी दोन हात करील. शिखर धवनच्या टीम इंडियासाठी यावेळी राहुल द्रविड यांच्याकडे प्रशिक्षकपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी मंगळवारी याबाबत स्पष्ट मत व्यक्त केले.


























































