आज जागतिक वाघ्र दिन! जगातील 70 टक्के वाघ हिंदुस्थानात!

355
फोटो-प्रातिनिधीक

जगातील 70 टक्के वाघ हे हिंदुस्थानातच असून, 1973 मध्ये हिंदुस्थानात केवळ 9 वाघ होते ही संख्या आता हजारोच्या घरात असल्याचे पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी जागतिक व्याघ्रदिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. द ऑल इंडिया टायगर एस्टीमेशनच्या वतीने 2018 मध्ये वाघाचा सव्र्हे करण्यात आला. याची यानुसार बछड्या व्यतिरिक्त वाघांची संख्या ही 2461 तर बछड्यासह 2967 नोंदविण्यात आली. ही संख्या 2006 मध्ये 1411 होती.

महाराष्ट्रातील वाघांच्या संख्येत वाढ

महाराष्ट्रात असणा-या 5 व्याघ्र प्रकल्पांमध्ये एकूण 312 वाघांची संख्या नोंदविण्यात आली आहे. 2006 मध्ये ही संख्या 103, 2010 मध्ये 168, 2014 मध्ये 190 आणि आता 2018-19 च्या सर्वेक्षणामध्ये हा आकडा वाढून 312 झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या