
वरळी अपघात प्रकरणातील आरोपी चालकाच्या रक्त चाचणी अहवालात प्रमाणापेक्षा जास्त अल्कोहोलचे प्रमाण आढळून आले आहे. शिवाय घटना घडली तेव्हा गाडी 90 ते 95 च्या वेगात होती असेही निष्पन्न झाल्याने दाखल गुन्ह्यात संबंधित कलम वाढविण्यात आले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
वरळी सीफेस येथे मॉर्निंग वॉर करणाऱ्या राजलक्ष्मी किजय रामकृष्णन या महिलेचा भरधाव कारने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली होती. याप्रकरणी चालक सुमेर मर्चंट याला वरळी पोलिसांनी अटक केली. मर्चंडच्या रक्त चाचणीचा अहवाल प्राप्त झाला असून घटनेच्या वेळी त्याच्या रक्तात प्रमाणापेक्षा जास्त अल्कोहोल असल्याचे आढळून आले आहे. शिवाय राजलक्ष्मी यांना धडक दिली त्यावेळी गाडीचा वेग 90 ते 95 दरम्यान होता असेही समोर आले आहे.

























































