
अमली पदार्थांची तस्करीप्रकरणी विदेशी नागरिकाला अमली पदार्थविरोधी कक्षाच्या वरळी युनिटने अटक केली. फ्रँक नण्डी असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून दोन कोटींचे कोकेन जप्त केले. तसेच त्याच्याकडून एक कार आणि तीन मोबाईलदेखील हस्तगत केले आहे. फ्रँकला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. शहरात अमली पदार्थ विव्रेत्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले होते. मालाड परिसरात एक जण ड्रग्ज खरेदीसाठी येणार असल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांना मिळाली. त्यानंतर उपनिरीक्षक प्रकाश सावंत आणि पथकाने मार्वे परिसरात सापळा रचला. पोलिसांनी सापळा रचून फ्रँकला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले. फ्रँक हा मूळचा नायजेरियाचा रहिवासी आहे. तो व्यावसायिक व्हिसावर मुंबईत आला होता. व्यवसायाआड तो ड्रग्जची तस्करी करत होता. कोकेन तस्करीप्रकरणी त्याच्या विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंद करून त्याला अटक केली.