…तर मी हिंदुस्थानी संघासाठी चार्टर्ड विमान ठेवले असते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आगामी आयसीसी वर्ल्ड कपदरम्यान हिंदुस्थानी संघाच्या भारत दर्शनाच्या कार्यक्रमावर कपिल देव यांनी जोरदार टीका केली. दहापैकी नऊ केंद्रांवर हिंदुस्थानचा संघ खेळणार आहे. हा कार्यक्रम थकवणारा आहे. जर मी बीसीसीआयचा अध्यक्ष असतो तर माझ्या संघाची काळजी घेण्यासाठी, त्यांची चांगली कामगिरी होण्यासाठी मी त्यांच्यासाठी एक चार्टर्ड विमान ठेवले असते. माझी एकच इच्छा आहे की, त्यांनी मैदानात जोरदार कामगिरी करावी. बाकी सर्व गोष्टींची काळजी घेण्याची जबाबदारी बीसीसीआयची असल्याचे कपिल यांनी सांगून संघासाठी चार्टर्ड विमान उपलब्ध करून द्यावे, असे संकेत दिले आहेत. आता कपिल यांच्या संकेतापासून बीसीसीआय काय धडा घेते हे लवकरच दिसून येईल.