
प्रसिद्ध WWE रेसलर जॉन हुबेर उर्फ लुक हार्पर उर्फ बोर्डी ली याचा नुकताच मृत्यू झाला आहे. तो 41 वर्षांचा होता. जॉनला फुफ्फुसांचा गंभीर आजार होता. हा आजार बळावल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे त्याची पत्नी अमांडाने सांगितले आहे.
जॉन हुबेरच्या मृत्यूनंतर WWE मधील अनेक दिग्गजांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. प्रसिद्ध रेसलर हल्क हॉगनने ट्विटरवरून हुबेरच्या मृत्यूने धक्का बसल्याचे सांगितले आहे. ‘जॉनच्या मृत्यूने जबरदस्त धक्का बसला आहे. एक हुशार व मोठ्या मनाच्या व्यक्ती होता, असे ट्विट हल्क हॉगनने केले आहे.
मिक फॉलेने देखील ट्विटरवरून जॉनच्या मृत्यूचे दुख व्यक्त केले. ‘जॉन हुबेरच्या मृत्यूची बातमी कळली. रेसलिंगच्या चाहत्यांसाठी हा दुखद दिवस आहे. हॅलोविनला माझा मुलगा लुक हार्पर सारखा तयार झलाा होता. तो एक चांगला सहकारी, एक चांगला पिता होता. रेसलिंग इंडस्ट्रीसाठी हा मोठा धक्का आहे’, असे ट्विट मिक फॉलेने केले आहे.

























































