Redmi Note 9 Pro ची आजपासून होणार ऑनलाईन विक्री; रेड झोनमध्येही मिळेल डिलिव्हरी

4576

शाओमी कंपनीचा नवीन Redmi Note 9 Pro आज दुपारी 12 वाजेपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. ग्राहक हा स्मार्टफोन अ‍ॅमेझॉन इंडिया आणि शाओमीच्या वेबसाइटवरून खरेदी करू शकतात. सरकारने आपल्या नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये ई-कॉमर्स कंपन्यांना रेड झोनमध्येही सूट दिली आहे. अशातच आता अधिक ग्राहक ऑनलाइन उत्पादने खरेदी करू शकतील.

मार्च मध्ये हिंदुस्थानात Redmi Note 9 Pro लॉन्च करण्यात आला होता. मात्र लॉकडाऊनमुळे याची विक्री थांबवण्यात आली होती. कंपनीने याचे दोन व्हेरियंट 4 जीबी + 64 जीबी आणि 6 जीबी + 128 जीबीसह बाजारात लॉन्च केले होते. याची किंमत 13,999 आणि 16,999 रुपये इतकी आहे. आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एक हजार रुपयांची सूट देण्यात येणार आहे. तसेच आयसीआयसीआय क्रेडिट कार्डवर ग्राहकांना ईएमआय पर्याय देखील मिळणार आहे. ग्राहकांसाठी हा स्मार्टफोन ऑरोरा ब्लू, ग्लेशियर व्हाइट आणि इंटरस्टेलर ब्लॅक रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

हा स्मार्टफोन अँड्रॉइड 10 बेस्ड एमआययूआय 11 वर चालतो. यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 सपोर्टसह 6.67 इंचाचा फुल-एचडी + (1,080×2,400 पिक्सेल) आयपीएस डिस्प्ले आहे. फोटोग्राफीसाठी याच्या मागील बाजूस क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक सेन्सर 48 एमपीचा आहे. याशिवाय यात 8 एमपी 120 डिग्री अल्ट्रा-वाईल्ड अँगल कॅमेरा, 5 एमपी मॅक्रो कॅमेरा आणि 2 एमपी डेप्थ कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी याच्या समोरील बाजूस 16 एमपी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यात 5,020mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या