आता तुमचा चहा राहणार गरमच.. बाजारात आलाय ‘हा’ खास कप!

1549

चीनची प्रसिद्ध टेक कंपनी Xiaomi ने एक खास कप लॉन्च केला आहे. हा कप आपल्या नेहमीच्या वापरातल्या सामान्य कप पेक्षा जरा वेगळा आहे. हा वायरलेस चार्जिंग टेक्नोलॉजी असणारा अॅडवान्स कप आहे. Warm Cup असे कंपनीने याचे नाव ठेवले आहे. चला तर जाणून घेऊ काय खास आहे या कपमध्ये…

Xiaomi चा हा हायटेक टेक्नॉलॉजी असलेला कप तुमची चहा थंड होऊ देत नाही. हा कप सतत 55 डिग्री सेल्सिअस तापमान मेन्टेन करतो. तापमान अबाधित ठेवण्यासाठी हा वायरलेस चार्जिंगचा वापर करतो. चहा किंवा कॉफी गरम ठेवण्यासाठी हा कप फक्त वायरलेस चार्जिंग पॅडच्या वर ठेवावा लागेल. हा कप आपण चार तास न वापरल्यास तो आपोआप बंद होऊन स्लिप मोडमध्ये जातो. यासोबत येणाऱ्या चार्जिंग पॅडचा उपयोग आपण आपले स्मार्टफोन चार्ज करण्यासाठीही करू शकता. हा वायरलेस हीटिंग पॅड 10 वॅट्सच्या पॉवर रेटिंगसह येतो.

कंपनीने हा Warm Cup आता केवळ चीन मधेच लॉन्च केला आहे. या कपची किंमत हिंदुस्थानी चलनात 2 हजार रुपये इतकी आहे. हा कप हिंदुस्थानात कधी लॉन्च होणार याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या