शाओमी आता टेस्लाला भिडणार, सर्वात स्वस्त कार आणणार

स्मार्टफोन बनवणारी कंपनी लवकरच आपल्या इलेक्ट्रिक कारवरून पडदा हटवणार आहे. शाओमीची कार ही स्वस्त इलेक्ट्रिक कार असणार आहे. त्यामुळे शाओमीच्या कारची थेट टक्कर एलन मस्क यांच्या टेस्लाशी होणार आहे. शाओमी कंपनीचे लक्ष्य जगातील टॉप फाइव्ह ऑटोमेकर पैकी एक बनणे आहे. शाओमीच्या कारची किंमत 5 लाख युआन म्हणजेच 69,242 डॉलर असेल. शाओमीचे सीईओ लेई जून यांनी अधिकृत वेईबो अकाउंटवर याची घोषणा केली. कंपनीने पहिल्यांदा आपल्या इलेक्ट्रिक कारच्या किंमतीची घोषणा केली आहे. शाओमीची कार ही टेस्ला कार आणि पोर्शेच्या ईव्ही कारपेक्षा जबरदस्त टेक्नोलॉजी दिली जाणार आहे. कंपनीने यासाठी शाओमी कार अॅप सुरू केला आहे. चीनमधील 29 शहरात 76 शाओमी स्टोअर्सने कारचा डिस्प्ले सुरू केला आहे.