
यशवंतराव चक्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे दिला जाणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्रख्यात कवी तथा गीतकार, लेखक गुलजार यांना प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्करूप आहे.
मुंबई येथील गुलजार यांच्या निवासस्थानी कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. मानपत्राचे वाचन प्र-कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन यांनी केले. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे माझे भाग्यच असल्याचे गुलजार यावेळी म्हणाले.


























































