Video – निळोणा धरण भरले, यवतमाळकर सुखावले

यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणारा निळोणा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. गेल्या 4 दिवसात धरण क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे निळोणा प्रकल्प 100 टक्के भरल्याने यवतमाळकर वासियांचा पाणी प्रश्न तूर्तास मिटला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे.