
यवतमाळ येथील बेंबळा प्रकल्पातून 50 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या पर्जन्यमान झाल्याने प्रकल्पाच्या जलाशय पातळीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे प्रकल्पाचे 25 सेंटिमटरने २ दरवाजे उघडल्याने यातून 50 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठील गावांना सर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.



























































