
प्रसाद नायगावकर, यवतमाळ
खासगीकरणाच्या विरोधात यवतमाळमध्ये बेरोजगार तरुणांनी साखळदंडाने स्वतःला बांधून घेऊन गुरुवारी निषेध मोर्चा काढला. या मोर्चात तरुण, तरुणी, विद्यार्थी, पालक आणि बेरोजगार युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. आझाद मैदानातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढला आझाद मैदानातून मोठ्या संख्येने हजारो तरुण-तरुणी या मोर्चा सहभागी झाले.
शासनाने कंत्राटी भरतीचा जो अध्यादेश जीआर काढला आहे तो मागे घ्यावा, शाळांचे खासगीकरण थांबवा, अशी मागणी घेऊन मोठ्या संख्येने तरुण या मोर्चा सहभागी झाले. हा अध्यादेश जर सरकारने मागे घेतला नाही तर त्याचे परिणाम निवडणुकीच्या काळात तरुण सरकारला दाखवून देईल असा इशाराही यावेळी तरुणांनी सरकारला दिला आहे. यावेळेस कंत्राटी धोरणाच्या विरोधात लोखंडी साखळ दंडाने स्वतःला बांधून घेऊन या आंदोलनात काही तरुण सहभागी झाले.


























































