शाळेच्या बसचा रंग पिवळा का असतो?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शाळेच्या बसचा रंग पिवळा का असतो?

  • अंधार, पाऊस, धुके अशा कोणत्याही वातावरणात पिवळा रंग लगेच दिसतो.
  • नजरेच्या कोणत्याही कोनातून पिवळा रंग सहज दिसतो.  यामुळे अपघातांचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे शाळेच्या बसचा रंग पिवळा असतो.
  • पिवळा रंग हा डोळ्यांना सहज दिसणारा आणि दृश्यमान रंग आहे. अनेक रंगांमधून तो पटकन दिसायला मदत होते.
  • प्रखर आणि मंद प्रकाशातही पिवळा रंग पटकन नजरेस येतो. बऱ्याच शाळांच्या बस विद्यार्थ्यांना घेऊन पहाटे लवकर निघतात. अशा वेळी मंद प्रकाशात हा रंग सहज उठून दिसतो.
  • फ्लॅशिंग लाइट आणि सेफ्टी डिव्हाइससोबत शाळेच्या बसचा रंग पिवळा हवा, असे परदेशातील कायदा सांगतो. त्यामुळे तेथे सगळ्या बसना पिवळाच रंग असतो. या रंगाला क्रोम या नावाने ओळखले जाते.
  • जर तुम्ही सरळ बघत असाल आणि बाजूला एखादी पिवळी वस्तू ठेवलेली असेल तर ती सहजरीत्या पाहू शकता. पिवळा रंग लाल रंगाच्या तुलनेत सर्वात जास्त लवकर आकर्षित करतो, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.