होय, लवकरच मी बाबा होईन! सलमान खान असे का म्हणाला, वाचा सविस्तर

सुपरस्टार सलमान खानच्या लग्नाचा प्रश्न त्याच्या चाहत्यांमध्ये बऱ्याच काळापासून चर्चेचा विषय आहे. तो कधी लग्न करणार आणि त्याची वधू कोण असेल हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. सलमान खानने अद्याप त्याच्या लग्नाबद्दल स्पष्टपणे सांगितले नाही, परंतु अलीकडेच त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यात एक इच्छा व्यक्त केली आहे. सलमान खानने अभिनेत्री काजोल आणि ट्विंकल खन्ना यांच्यासोबतच्या चॅट शो दरम्यान ही इच्छा व्यक्त केली. तो म्हणाला, “मला बाबा व्हायचे आहे.”

प्राइम व्हिडिओच्या पहिल्या भागात, प्रसिद्ध बॉलीवूड स्टार सलमान खान आणि आमिर खान एकत्र दिसणार आहेत. या भागात आमिर खानने सलमानसोबतच्या त्यांच्या घट्ट मैत्रीबद्दल उघडपणे सांगितले. आमिरने खुलासा केला की, जेव्हा सलमान त्याच्या घरी जेवायला आला तेव्हा त्यांची मैत्री सुरू झाली. आमिर म्हणाला, “जेव्हा मी माझी पहिली पत्नी रीना दत्ता हिच्या घटस्फोटातून जात होतो, तेव्हा सलमान पहिल्यांदा माझ्या घरी आला होता. त्या दिवसापासून आमची मैत्री चांगली झाली.”

आमिर खानने कबूल केले की तो सुरुवातीला सलमानबद्दल खूप साशंक होता. आमीर आणि सलमानने या भागात एकमेकांच्या मैत्रीविषयी खुलेआम आणि मनमोकळेपणे चर्चा केली. तसेच यावेळी सलमानने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अनुभवही शेअर केले. ब्रेकअपबद्दल बोलताना तो म्हणाला, “आयुष्याचा जोडीदार हा कायम सदैव पाठिंबा देणारा हवा. जेव्हा पाठिंबा देणारा जोडीदार नसतो तेव्हा मग नात्यात अडचणी निर्माण होतात.

सलमान खानसोबतच्या मैत्रीबद्दल आमिर खान म्हणाला, “खरं तर, जेव्हा मी माझी पहिली पत्नी रीनापासून घटस्फोट घेत होतो, तेव्हा सलमान खान पहिल्यांदाच माझ्या घरी आला. त्या दिवसापासून आमची मैत्री चांगली झाली. त्याआधी, मला असे वाटायचे की सलमान वेळेवर येत नाही, विशेषतः ‘अंदाज अपना अपना’च्या शूटिंग दरम्यान, ज्यामुळे आम्हाला त्रास होत असे.” असे अनेक किस्से या दोघांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेअर केले आहेत.