
सामना ऑनलाईन । लखनौ
उत्तर प्रदेशमध्ये शहरांच्या नावांनंतर योगी सरकारनं आता राजधानी लखनौमधील इकाना स्टेडियमचं नाव बदललं आहे. इकाना या स्टेडियमचं नाव बदलून माजी पंतप्रधान, भारतरत्न दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव त्याला देण्यात आलं आहे.
मंत्रिमंडळाने घेतलेल्या नाव बदलाच्या या निर्णयाला राज्यपालांनी तात्काळ मंजुरी दिली. या निर्णयानंतर राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांनी या नवीन नाम फलकाचे उद्घाटन केले.
लखनौमध्ये 24 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरचा क्रिकेटचा सामना होत आहे. आज होणारा सामना जिंकून हिंदुस्थानच्या चाहत्यांना दिवाळीनिमित्त मालिका विजयाची गोड भेट द्यायची असा निश्चय टीम इंडियानं केला आहे.
Lucknow: UP CM Yogi Adityanath inaugurates ‘Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium’. Ekana Cricket Stadium was yesterday renamed as ‘Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium’ pic.twitter.com/dh3fsL3hYR
— ANI UP (@ANINewsUP) November 6, 2018



























































