
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक प्रथमच लढवणार आहेत. त्याला योगी यांनी दुजोरा दिला आहे. विधानसभेची निवडणूक लढवण्याची त्यांची ही पहिलीच वेळ असणार आहे. योगी आदित्यनाथ यांनी आतापर्यंत लोकसभा निवडणूक लढवली असून 2014 मध्ये ते गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची विधान परिषदेवर निवड करण्यात आली होती. त्यामुळे ते आता प्रथमच विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, माझ्या विधानसभेची निवडणूक लढवण्याबाबत कोणतीही शंका नाही. मात्र मी पुठून निवडणूक लढवावी याबाबत पक्ष निर्णय घेईल, असेही योगी यांनी म्हटले आहे.




























































