योगी आदित्यनाथ आज मुंबईत

430

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्रचारात उतरवले आहे. योगी आदित्यनाथांना भाजपने प्रचारासाठी आमंत्रण दिले असून ते  गुरुवारी मुंबई येत आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते एका दिवसात मुंबईसह राज्यभरात चार प्रचारसभा घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी विजयादशमीच्या मुहूर्तावर सर्वच पक्षांच्या प्रचाराचा नारळ फुटला असून प्रचाराला आता खर्‍या अर्थांने रंगत चढली आहे. शिवसेना-भाजप महायुतीने प्रचारात आघाडी घेतली असून आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीही महाराष्ट्राच्या प्रचारात उतरणार आहेत. मुंबईत कुलाबा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्या प्रचारासाठी काळाबादेवी येथे दुपारी 3 वाजता तर कांदिवली येथील अतुल भातखळकर यांच्यासाठी सायंकाळी 6 च्या सुमारास त्यांची जाहीर सभा होणार आहे.  मुंबईतील दोन सभांबरोबरच आणखी दोन सभा त्यांच्या राज्यात होणार आहे. रावेरमध्ये हरिभाऊ जावळे यांच्यासाठी तर परभणी येथे शिवसेना उमेदवार डॉ. राहुल पाटील आणि विशाल कदम यांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ यांची सभा होणार आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ काय बोलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या