राजापूरातील नाटे खाडीत आढळला तरुणाचा मृतदेह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
राजापूर तालुक्यातील नाटे येथे एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू होते. मात्र आता या मृतदेहाची ओळख पटली आहे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. राजापूर दोनिवडे येथील मंगेश मोतीराम कुळये ( 37 ) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मंगेश हा आपल्या राहत्या घरातून 15 ऑगस्टच्या सकाळी बाहेर पडला होता. परत न आल्याने बेपत्ता असल्याची तक्रार राजापूर पोलीस स्थानकात 18  ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. शोध आणि तपास कार्य सुरू होते दिनांक 19 ऑगस्ट रोजी दुपारी नाटे फणसेवाडी लालमाती खाडीच्या पाण्यात मयत स्वरूपात आढळून आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. घटनास्थळाला सागरी पोलीस ठाणे नाटेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी भेट दिली. सहाय्यक पोलीस फौजदार झगडे अधिक तपास करीत आहेत .