जुन्या भांडणाच्या रागातून पुण्यात तरूणावर वार, रिक्षाची तोडफोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुन्या भांडणाच्या रागातून पुण्यात टोळक्याने तरूणावर वार करून गंभीररित्या जखमी केले. तसेच टीव्हीसह रिक्षाची तोडफोड करून नागरिकांमध्ये दहशत माजविली. ही घटना 12 जूनला रात्री सातच्या सुमारास हडपसरमधील सोनार वस्ती येथे घडली. चिक्या उर्फ ओंकार बगाडे (वय 19 रा. रामटेकडी ) असे जखमीचे नाव आहे. अजय उर्विडे, फिटर उर्फ प्रेम थोरात, इरफान शेख, मंगेश जाधव, अर्थव शिंदे या सर्व रामटेकडी येथे राहणाऱ्यांच्याविरूद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिक्या उर्फ ओंकार आणि आरोपी अजय, प्रेम, इरफान एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यांच्यात काही दिवसांपुर्वी किरकोळ कारणावरून वादावादी झाली होती. दरम्यान, 12 जूनला ओंकार मामाच्या घरी रामटेकडी परिसरातील सोनार वस्ती या ठिकाणी गेले होते. त्यावेळी आरोपींनी ओंकारला गाठून जुन्या भांडणाचा जाब विचारला. यावेळी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मामाच्या घरातील 25 हजारांचा टीव्ही फोडला. आज तुझी विकेट टाकणार असे म्हणत टोळक्याने त्यांच्यावर कोयत्याने वार करून जखमी केले. परिसरातील संदीप लोहार यांच्या रिक्षाची काच फोडून नुकसान केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले तपास करीत आहेत.