ट्रकच्या चाकाखाली सापडून तरुणाचा जागीच मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिपळूण शहरातील पॉवर हाऊस येथे दुचाकीस्वाराचा ट्रकखाली सापडून जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली आहे. हा अपघात सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडला.

किरण कृष्णा घाणेकर, असे या दुचाकीस्वाराचे नाव आहे. रोलरने खड्डे बुजवज असताना ठेकेदार कंपनीने सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही काळजी न घेतल्यास हा अपघात घडल्याची चर्चा अपघातस्थळी केली जात होती .मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविण्यात यावी, यासाठी राजकीय पक्षांनी आंदोलने केली.

पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा गाजला. या अनुषधाने गेल्या दोन दिवसापासून चिपळूण शहरात खड्डे बुजविण्याच्या कामास सुरवात झाली. शनिवारी पाग पॉवर मार्गावर खडे बुजवविण्याचे काम सुरू होते. दरम्यान लोटे दिशेकडून कोंडमळ्याकडे जाणारा दुचाकीस्वार पाग पॉवर हाऊस येथे आला असता समोरून येणाऱ्या ट्रकखाली तो सापडला. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या तरूणाने हेल्मेट घातलेले असतानाही त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या तरुणाचा मृतदेह कामथे उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे.