माजलगावात तरुणाचा नदीत बुडून मृत्यू

639

माजलगाव तालुक्यातील सादोळा येथे तुडुंब भरलेल्या गोदावरी नदी पात्रात तोल जाऊन पडल्याने तरुणाचा मृत्यू झाला. रवी बाळासाहेब सोळंके असे या वर्षीय तरुणाचे नाव असून बुधवारी त्याचा मृतदेह सापडला आहे.

सादोळा येथे गावास लागून गोदावरी नदी वाहते. सध्या ती तुडुंब भरलेली आहे. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास रवी हा आपला मित्र जगू शेळके याचे समवेत चप्पूवरून फिरत पलीकडील तिरावर गेला होता. मात्र अचानक तोल गेला व पाण्यात पडला. जगू याने आरडाओरडा केला मात्र तोपर्यंत रवी बुडाला होता. या नंतर गावातील तरुण व स्थानिक भोई यांनी पाण्यात सर्वत्र शोध घेतला मात्र दोन दिवस उलटले तरी रवीचा शोध लागला नव्हता. याबाबत पोलिसांना सोमवारीच कळवण्यात आले. अखेर बुधवारी त्याचा मृतदेह पाण्यात फुगून वर आला.

आपली प्रतिक्रिया द्या