
आंबा खाल्ल्यानंतर फेकून दिल्या जाणार्या बाठांपासून तेलनिर्मिती आणि मँगो बटर तयार करण्याचे यशस्वी संशोधन राजापूर तालुक्यातील खडकवलीचे डॉ. ऋषिकेश गुर्जर यांनी केले आहे.
आंब्याच्या बाठांपासून तयार केलेले तेल आणि मँगो बटर अन्नउद्योगासाठी पौष्टिक व स्थिर चरबी स्रोत; तर कॉस्मेटिक उद्योगासाठी नैसर्गिक व पर्यावरणपूरक घटक म्हणून उपयुक्त ठरणार आहे. डॉ. गुर्जर यांनी केलेल्या संशोधनामुळे फेकून देण्यात येणार्या बाठांचा पुनर्वापर करून त्याच्या साह्याने शाश्वत उत्पादन, स्थानिक उद्योगांची वाढ करण्याच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
हापूस आंब्याच्या बाठांचा नवीन कलमांच्या निर्मितीशिवाय अन्य पुनर्वापर केला जात नाही, हे लक्षात घेऊन डॉ. ऋषिकेश यांनी बाठांवर संशोधन केले. त्यात बाठांच्या तेलाचे निष्कर्षण करून गुणधर्म तपासले. त्यानंतर नानकटाई कुकीजमध्ये त्यांनी वनस्पती तुपाऐवजी या तेलाचा वापर केला. आंबा बाठांपासून मिळणारे तेल शुद्ध केल्यानंतर ते मँगो बटर या स्वरूपात रूपांतरित केले जाते. हे बटर कॉस्मेटिक उद्योगात विशेषतः त्वचा मृदुकारक, लीप बाम, लोशन, हेअर क्रीम आणि साबणाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वापरले जाऊ शकते.
मँगो बटरमध्ये ओलेइक अॅसिड आणि स्टिअरिक अॅसिड मुबलक प्रमाणात असल्यामुळे ते त्वचेसाठी अत्यंत सुरक्षित, पोषणदायी आणि हायपोअॅलर्जेनिक मानले जाते. बटर खाद्य स्वरूपातही ते पूर्णतः सुरक्षित असून, वनस्पती तुपाचा उत्कृष्ट पर्याय म्हणून कुकीज, बेकरी पदार्थ, चॉकलेट, मिठाई आणि स्नॅक्स उत्पादनात वापरण्यास उपयुक्त आहे.
कोयींचे तेल आणि त्यापासून तयार होणारे मँगो बटर हे दोन्ही अन्नउद्योगासाठी पौष्टिक व स्थिर चरबी स्रोत आणि कॉस्मेटिक उद्योगासाठी नैसर्गिक व पर्यावरणपूरक घटक म्हणून उपयुक्त ठरत असल्याचे डॉ. गुजर यांनी केलेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. डॉ. गुर्जर यांनी आंब्याच्या बाठांपासून तेल निर्मितीबाबत संशोधन करून बाठांपासून तेलनिर्मितीसाठी विभक्त प्रक्रिया आणि प्रचंड दाबाचा वापर करण्यात आला आहे. प्रक्रियेअंती विभक्त प्रक्रिया पद्धतीमध्ये सर्वाधिक तेल उत्पन्न 10.90 टक्के मिळाले आहे. आंब्याच्या बाठांपासून तयार करण्यात आलेले तेल वनस्पती तुपाचा पर्याय म्हणून नानकटाई कुकीज तयार





























































