
लेखक-दिग्दर्शक स्वप्नील मयेकर यांचे गुरुवारी पहाटे चेंबूर घाटला गाव येथील राहत्या घरी निधन झाले. ते 46 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.
स्वप्नील मयेकर यांचा ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा चित्रपट उद्या 5 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. पण प्रदर्शनाच्या एक दिवस आधीच स्वप्नील यांचे निधन झाल्याने या चित्रपटाच्या टीमवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यापूर्वी स्वप्नील यांनी ‘हा खेळ संचितांचा’ या मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. स्वतंत्र लेखक-दिग्दर्शक म्हणून ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता. एका धडाडी तरुण उद्योजकाची कथा या चित्रपटात त्यांनी मांडली आहे.
























































