
सामना प्रतिनिधी । चंद्रपूर
जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील रामदेगी पर्यटनस्थळ परिसरातील पाण्याच्या कुंडा जवळ मोबाईलने सेल्फी घेताना एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. २४ तासाच्या शोधमोहीमेनंतर या तरुणाचा मृतदेह हाती लागला. शैलेश खेळकर (27) असे मृतकाचे नाव असून तो नागपूर येथील रहिवासी होता.
चार मित्र नागपूवरून चारचाकी वाहनाने चिमूर तालुक्यातील रामदेगी पर्यटनस्थळी फिरायला आले होते. परिसरात फेरफटका मारल्यानंतर कुंडावर चौघे सेल्फी घेत होते या वेळी शैलेश पाण्यात पडला आणि त्यातच त्यांचा अंत झाला. शेगाव पोलीस घटना स्थळी पोहचून त्यांनी आत शैलेशचा मृतदेह शोधला. तर पुढील तपास शेगाव पोलीस करीत आहे.


































































