
सामना ऑनलाईन । तिरुवनंतपुरवम
प्रेमाला नकार दिल्याच्या रागातून केरळमधील एका तरुणाने तरुणीला पेट्रोल टाकून जाळले आहे. या घटनेत मुलगी गंभीरपणे होरपळली असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Thiruvalla: 18-yr-old boy Ajin Reji arrested on charges of setting ablaze an 18-yr-old girl. According to police, accused knew the girl & they were walking together when he took out a can of petrol & set her on fire.The girl sustained 60% burns&is in a critical condition. #Kerala pic.twitter.com/uwqSW9xCjs
— ANI (@ANI) March 12, 2019
अजिन मॅथ्यू या तरुणाचे तरुणी कविता विजयकुमारी हिच्यावर एकतर्फी प्रेम होते. अजिनने कविताला प्रेमाची मागणीही घातली होती. परंतु तिने त्याला साफ नकार दिला होता. ही बाब त्याला सहन नाही झाली. मंगळवारी सकाळी 9.15 च्या सुमारास कविता कॉलेजला जात होती. अजिनने त्यावेळी कविताला गाठले. रस्त्यात फार रहदारी नव्हती. त्याने दोन बाटल्या भरून पेट्रोल आणले होते. जेव्हा कविताने पुन्हा प्रेमास नकार दिला तेव्हा अजिनने तिच्यावर पेट्रोल ओतले आणि आग लागली. या आगीत कविता 60 टक्के भाजली आहे. इस्पितळात तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे.
उपस्थित जमावाने आरोपी अजिनला ताब्यात घेतले आणि पोलिसांच्या हवाली केले आहे. पोलिसांनी अजिनला ताब्यात घेतले आहे व पुढील तपास सुरू आहे.


























































